------अडचणी
लाटेक् ही एक आज्ञावली आहे. तिच्या प्रक्रियेत वापरकर्त्यांकडून काही चुका होऊ शकतात व त्यांमुळे आज्ञावलीय विश्वात फार सहज आढळणाऱ्या अडचणींचा सामना लाटेक्-वापरकर्त्यांनाही करावा लागू शकतो.
सर्वसामान्य अडचणी
ह्या पृष्ठावर आपण सर्वसामान्य अडचणींबाबत माहिती घेऊया. प्रत्येक अडचण तिचे कारण काय आहे ह्याबाबत थोडी माहिती देते.
ह्यासाठी उदाहरणे चालवून पाहणे उपयुक्त ठरतेच, परंतु त्यांच्यातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करणेदेखील तितकेच महत्त्वाचे.
pdflatex not found
अनेकदा सुरुवातीला वापरकर्त्यांना दिसणारी अडचण -
{: .noedit :}
ही विंडोज़् प्रणालीवर व
{: .noedit :}
ही लिनक्स प्रणालीवर.
ही लाटेक्-ची अडचण नसून कार्यकारी प्रणालीची अडचण आहे. ह्या अडचणीत असे सांगितले आहे की टेक् संगणकावर बसवले नाही अथवा ते मला सापडले नाही. वापरकर्त्यांकडून एक सामान्य चूक होते ती अशी की ते केवळ लाटेक्-चा संपादक संगणकावर बसवतात व टेक्-वितरण बसवतच नाहीत. त्यामुळे ही अडचण येऊ शकते.
टेक् अडचणीची चिकित्सा
This produces a multi-line message in the log file.
{: .noedit :}
अडचणीची पहिली ओळ
!ह्या चिन्हासह सुरू होते. हे त्या अडचणीचे सामान्य स्वरूप स्पष्ट करते. इथे आज्ञेची व्याख्या झाली नाही अशी अडचण दाखवण्यात येत आहे.ह्यानंतर दुसऱ्या ओळीवर टेक् ज्या ओळीवर प्रक्रिया करत होते ती ओळ दाखवण्यात येते. ही ओळ जिथे संपते तिथे टेक् थांबले असा अर्थ होतो. व्याख्या न केली गेलेली आज्ञा हेच प्रक्रियेतील शेवटचे अक्षर असते, त्यामुळे ओळीच्या शेवटी ते दिसत आहे.
\textboldही आज्ञा इथे व्याख्या न केली गेलेली आहे. ओळतोडीनंतर जे शेष असते ते लिहिले जाते. टेक्-ने त्यावर अजून प्रक्रिया केली नसते. ह्या उदाहरणात{hmmm}हा कार्यघटक अशा रीतीने टेक्-च्या प्रक्रियेतून राहिला आहे.ह्यानंतर काही आणखी ओळी असू शकतात, ज्यांमुळे आज्ञेतील दोष स्पष्ट होईल.
शेवटची ओळ
l.ह्या अक्षराने सुरू होते, त्यापुढे एक आकडा लिहिला असतो व शेवटी बीजधारिकेतील ती ओळ लिहिली असते जिथे टेक्-ला अडचण जाणवते.शेवटी
?असते, जिथे टेक् पुढे काय करावे हा प्रश्न वापरकर्त्यास विचारते. जर तुम्ही एखादा मजकूर संपादक वापरत असाल, तर बहुतांश वेळा त्यात अडचणी आल्यास न थांबता प्रक्रिया पूर्ण करण्याची सोय केली असते, परंतु आज्ञापटलावरून टेक् चालवत असाल, तर मात्र टेक्-ला विविध आज्ञा सांगून प्रक्रियेची पुढील दिशा ठरवता येते.
ह्याकडे विशेष लक्ष द्या की नवीन आज्ञेची व्याख्या करताना जर चूक घडली, तर टेक्-ला ती दिसत नाही. अशी चुकीची व्याख्या जर वापरली गेली, तरच ही चूक टेक-ला कळते. वास्तविक जर ही चुकीची आज्ञा दस्तऐवजात वापरलीच गेली नाही, तर टेक्-ची प्रक्रिया कोणत्याही अडचणींशिवाय पार पडते. त्यामुळे जरी अडचण ओळक्रमांक ७वर दाखवली जात असली, तरी आज्ञावलीतील चूक ओळक्रमांक ३वर आहे.
काही संपादक एका ओळीत अडचणींचा गोषवारा देण्याचा प्रयत्न करतात. उदा.
line 7: undefined command: ...\mycommand
हा गोषवारा दिशाभूलकारक ठरू शकतो, कारण \mycommand ह्या आज्ञेची व्याख्या खरे तर झाली आहे. अडचण त्या व्याख्येत आहे व हे कळण्यासाठी अडचणीतील संपूर्ण निरोप वाचणे आवश्यक ठरते.
कंसांची चुकीची जोडी
इथे चूक एका चौकटी कंसाला महिरपी कंसाने संपवणे ही आहे. एक अधिकचा महिरपी कंस लाटेक्-चालन अयशस्वी ठरवतो. दुर्दैवाने ह्यामुळे दाखवली जाणारी अडचण पुरेशी स्पष्ट नाही. त्याने नेमकी चूक कळत नाही.
{: .noedit :}
अडचणीतील निरोप जरी पुरेसा स्पष्ट नसला, तरी ओळक्रमांक व नेमकी चुकीची जागा टेक् पुढील प्रकारे दाखवते व ते मात्र कारण समजून घेण्यास निश्चितच उपयुक्त ठरते. टेक्-ने कुठवर प्रक्रिया केली आहे व ते कुठे थांबले हे आपल्याला अशा प्रकारच्या अडचणींमुळे अचूक कळते.
{: .noedit :}
गहाळ धारिका
ह्या आज्ञावलीसह पुढील अडचण दाखवली जाते
{: .noedit :}
ही अडचण दोन कारणांमुळे दाखवली जाऊ शकते.
लेखनातली चूक. (इथे
amsmathzही चूक. मूळ नावamsmath) ह्या प्रकारची चूक दुरुस्त केल्यास अडचण जाऊ शकते.खरोखरीच एखादा आज्ञासंच संगणकावर बसवलेला नसणे. त्याची धारिका गहाळ असणे.
दर्शनी गणितात मोकळ्या ओळी
ह्यामुळे एक विचित्र अडचण दाखवली जाते.
{: .noedit :}
परंतु हिला सोडवणे वास्तविक खूप सोपे आहे. मोकळ्या ओळी गणितक्षेत्रात चालत नाहीत व त्या काढून टाकल्या पाहिजेत.
स्वाध्याय
वरील उदाहरणांतील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा.
काही चुका असलेली लहानसहान उदाहरणे तयार करा. त्यांना चालवल्यावर टेक् दाखवणाऱ्या अडचणींचे स्वरूप नोंदवून घ्या.