------शीर्षके
लाटेक् तीन तार्किक आज्ञांचा वापर करून दस्तऐवजाची पायाभूत माहिती (मेटाडेटा) साठवते व एका आज्ञेसह तो छापते.
\author, \title व \date ह्या आज्ञा माहिती साठवतात व \maketitle ही आज्ञा ती माहिती छापते. अनेक लेखक असतील, तर त्यांची नावे \and ह्या आज्ञेसह वेगळी केली जातात. \author, \title व \date ह्या आज्ञा \maketitle आज्ञेपूर्वी येणे आवश्यक असते. येथे आपण ह्या आज्ञा document क्षेत्रात लिहिल्या आहेत. त्या आज्ञापीठातही लिहिता येणे शक्य आहे.
\maketitle ह्या आज्ञेचे फलित लाटेक्-वर्गावर अवलंबून आहे. (पाहा: प्रकरण ५). titlepage ह्या क्षेत्रासह स्वतःचे मुखपृष्ठदेखील बनवता येणे शक्य आहे, परंतु ह्या प्रकरणाच्या मुख्य विषयात ते बसत नाही, त्यामुळे इथे त्याची चर्चा पुरे. जर मुखपृष्ठाची रचना स्वतःच करायची असेल, तर memoir सारखा लवचीक लाटेक्-वर्ग वापरावा, अन्यथा book हा मूळ लाटेक्-मधील आज्ञासंच वापरावा.
वर्णनक्रमित याद्या
अनुक्रमित व बिंदुक्रमित याद्यांप्रमाणेच लाटेक्-मध्ये वर्णनक्रमित याद्यादेखील घडवता येतात.
स्वाध्याय
\author, \title व \date ह्या आज्ञांचे कार्यघटक बदलून फलितात होणारा फरक पाहा. ह्यांपैकी कोणत्या आज्ञा वापरणे \maketitle आज्ञा यशस्वीरीत्या चालण्याकरिता अतिशय आवश्यक आहे?
काही वर्णनक्रमित याद्या बनवा. त्यांना एकमेकींच्या पोटात लिहून पाहा. बिंदुक्रमित अथवा अनुक्रमित याद्यांच्या पोटात वर्णनक्रमित याद्या लिहून पाहा.