------संज्ञासूची छापणे
तुमच्या दस्तऐवजाच्या स्वरूपानुसार तुम्हाला संज्ञासूची छापण्याची आवश्यकता वाटू शकते. हे काहीसे संदर्भसूची छापण्यासारखेच आहे. ह्याकरिताही साहाय्यक धारिका निर्माण होतात. ह्या सर्व प्रक्रियेचे स्वयंचलन imakeidx आज्ञासंचातर्फे होते. ह्याकरिता लाटेक्-ला तीन सूचना देण्याची गरज असते.
\makeindexआज्ञा, हिच्यासह सूची तयार होते\indexआज्ञा, हिच्यामुळे नोंदी तयार करता येतात\printindexआज्ञा, हिच्यामुळे सूची छापली जाते
इथे आपण सूचीची दोन वैशिष्ट्ये पाहिली आहेत. ! ह्या चिन्हासह उपविभाग तयार करणे. तसेच अनुक्रमित सूचीतील मजकुरापेक्षा काही वेगळे लिहिण्यासाठी @ ह्या चिन्हाचा वापर. ह्यात आणखी बरेच बदल करता येऊ शकतात. उदाहरणे चालवून पाहा.