Book a Demo!
CoCalc Logo Icon
StoreFeaturesDocsShareSupportNewsAboutPoliciesSign UpSign In
jjtorrens
GitHub Repository: jjtorrens/learnlatex.github.io
Path: blob/main/mr/more-16.md
3168 views
---
layout: "lesson" lang: "mr" title: "अधिक माहिती: हस्तपुस्तिका वापरणे व मदत मिळवणे" description: "ह्या प्रकरणात आपण लाटेक्-ची बीजसामग्री व हस्तपुस्तिका कशा पाहाव्यात हे पाहूया." toc-anchor-text: "अधिक माहिती: हस्तपुस्तिका पाहणे व मदत मिळवणे."
---

लाटेक् दस्तऐवज

texdoc ही आज्ञा पूर्वी म्हटल्याप्रमाणे हस्तपुस्तिका वाचण्याकरिता अत्यंत उपयुक्त आहे, परंतु त्याव्यतिरिक्त लाटेक्-बाबत आणखी जिज्ञासा असेल, तर पुढील दुवेही उपयुक्त ठरू शकतात.

source2e.pdf ह्या नावाने लाटेक्-ची स्वतःची बीजआज्ञावली टेक्-वितरणांत उपलब्ध आहे. वाचण्याकरिता आज्ञापटलावर texdoc source2e लिहा अथवा texdoc.org ह्या दुव्यासह महाजालावर वाचा.

नवीन लाटेक् वितरणे लाटेक्-३ ही आज्ञावली वापरतात. ही आज्ञावली पूर्वी expl3 ह्या आज्ञासंचासह उपलब्ध होती. texdocसह expl3 आज्ञासंचाचा वापर (texdoc interface3) अथवा expl3 बीज (texdoc source3) वाचता येऊ शकते.